प्रत्येक कळीला हक्क आहे फुलण्याचा

काय दिवस आलेत ना आपल्या so called स्री पुरुष समानता मानन

मानणा~या समाजावर..आज एका कळीला तीच्या हक्का साठी बोलाव लागतय..हा विषय कसा हो शकतो आणि तुम्हाला का मागु आम्ही आमच्या जगण्याचा हक्क..कोण आहात तुम्ही देव की नशीब..
अरे प्रत्येक कळीला हक्क आहे फुलण्याचा…
सा~याच कळयांना जन्मसिध्द हक्क आहे फुलण्याचा
मातीवरचा वतनवारस आकाशात कोरण्याचा
जन्म असो माळावरती अथवा असो उदयानात
प्रत्येक कळीला जन्म हक्क आहे फुल म्हणून जगण्याचा.
गुलाब असो,कमळअसो,कळी असो
गटारातली तिझ्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सुर्याचा प्रत्येक कळीत जगत असतो निर्धार फुल होण्याच्या दिमाख्याने दिसण्याचा अन् सुंगधाने असण्याचा ..
मला ना आज स्वतःशी बोलायच आहे..वक्तुत्व पेक्षा मला माझ नेतृत्व करायच आहे..
आहो साक्षात त्या भंगवतानी तिची काय सुंदर रचना केली आहे.तो स्वतःलाही आडवु शकला नाही स्त्री या रुपात पाहण्यासाठी..भगवान शिवचे अर्धनारी हे रुप आठवत आसेल ना..’तिला ‘ घडवताना त्या परमेश्वराला देखील किती तरी प्रश्नाचा सामना करावा लागले असेल.
आज या कलियुगात स्ञी जीवनात कितीतरी गोष्टीनी हाहाकार माजवला आहे.ती हतबल,लाचार झाली आहे.तिच्या अश्रुंनी हंबरडा फोडला तरी तिची कोणाला दया येईना.
जन्मापासून ते मरणापर्यत तिच्या वाटलाला भोग आहे. मुलगी झाली म्हणून नाकतोंड मुरडणारे तिच्याच रक्ताची माणसे असतात.सतत हाडसहिडस करणे घालूनपाडून बोलणे ..अशा ब~याच गोष्टी तिच्या बाबतीत घडत असतात.प्रत्येक ठिकाणीच असे घडले असे नाही.काही ठिकाणी तिच्या जन्माचे स्वागत तिला लक्ष्मी समजून करतात.
असा विचार सगळेजण नाही करत.
काही कुटुंबामध्ये तर एकामागोमाग मुली झाल्या तर गर्भ पाडला जातो.
आ रे का रे तिला ही हक्क आहे फुलण्याचा ..
मुलगी स्वत:चे शिक्षण घेऊन पुढे जाते .स्वत:च्या पायावर उभी राहते.स्वत:च्या जबाबदा~या नीट संभाळते.तरी तिच्या वाट्याला असे भाग्य का?
आज स्ञीमुळे पुरूष हा अपूर्ण आहे.पुरूषांनी किती जरी अटकेपार झेंडे लावले तरी त्यांने एक गोष्ट कायम ध्यानात ठेवावी शेवटी आपला जन्म तिच्याच गर्भातून झाला.
पुरूषाच्या यशामागे स्ञी असते मग ती कोणाची आई,बहिण,बायको,मुलगी,मैञीण व प्रियेसी यांचा नक्की वाटा असतो.
स्ञीजात आज जगात कुठेच कमी नाही.असे कितीतरी उदाहरण आपल्याला बघायला मिळतात.स्वत:च्या हिंमतीवर ती स्वत:चे रक्षण करू शकते.
बाई जातीला फक्त एकच गोष्टीमुळे तडा जातो.तिच्या इज्जतिचे काढलेले वाभडे..पिसाळलेले मोकाट कुञे जेव्हा तिची अब्रू लुटतात.लाचार होते ती हतबल होते.प्रियंका,निर्भया या मुलीला देखील फुलण्याआधीच त्यांचे जीवन नष्ट केले …न्याय मिळतो पण तोपर्यत खूप उशीर झालेला असतो. काहो ईतकी भिती वाटावी तुम्हाला आमची ती मलाला युसुफजाई तीझा दोष काय तर फक्त तीला शिकायच हो बस..अरे माणसांनो तुम्ही तीच्यावर गोळ्या झाडल्यात अक्षरशहा ती रक्तात पडली..पण ती मोडली नाही..पुढे जाऊन तीच अनेक मुलींसाठी सरस्वती झाली.
अरे आमच मन आमच अस्तितव फक्त माना तुम्ही आज एक सिंधु ताई स्वतःवरचे आत्याचार विसरुण लाखोंची माई झाली..किती द्यावीत ऊदाहरण..तुमचे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज ना.मग का त्यांचे विचार आचरणात नाही आणत हो आपण.. आधी मला सरकारी दवाखाण्याचा बाहेर गर्भ पाडण्यासाठी लाईन पाहुन आनंद करावा की दुख कळत नाही आता..आहो आता या कळ्या खुडल्या जानार ह्या दुख तर असतच….पण त्या कळ्या पुढे जाऊन कुणा हरामखोराच्या हवसच शिकार होणार नाही किंवा नवरा नावाच्या प्राण्याकडुण किंवा समाजाकडुन ती ओरबडली जाणार नाही याचा आनंद…
आ रे का रे तिचा जगण्याचा हक्क हिरावून घेतानी तुम्हाला लाज कशी नाही वाटत.
तिला ही अधिकार आहे.स्वच्छंदीपणे आकाशात उडण्याचा.आपले जीवन जगण्याचा पण काही नालायक पुरूष जात ओराबाडून घेते तिचे आयुष्य..अरे नालायक पुरुषांनो एका स्रीला म्हणजे आपल्या बायकोला सांगता की मला मुलगी नकोय..काय म्हणत असेल तीज काळीज…निदान आईच दुध पिल्याची तरी ईमान राखा..
आजुन एक दुसरी बाजु अनेकदा बायकांना आपल्या पदरात कृष्ण हवा असतो काहो ताई राधा नाही चालत का…सर्वात आधी ना बाळंत पणात समोरीव भिंतीवर फक्त मुलाचे फोटो लावने बंद करा..
जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी जाते तेव्हा सुध्दा ति सासरच्या कचट्यात सापडते,एकतर्फी प्रेमातून अन्याय, हु़ंडयासाठी अन्याय,वंशाला दिवा पाहिजे म्हणून अन्याय,कधी तर स्वत:च्या पोटासाठी तिला देहविक्री करावा लागतो..
फक्त एकच सांगणे आहे. तिला ही जगू दया तुम्ही जगा .तिला कमजोर समजू नका.ति जशी तुमचे जीवन फुलवू शकते तसे नष्ट ही करू शकते.अरे बापाच्या ह्रदयाची फुंकर असते कळी,आईची सावली तर भावाची बाहुली असते कळी…प्रेमाचा झरा आणि सुखाची नदी असते कळी..गुणांची खाण असते कळी..घरची ल्क्षमी असते कळी..खोट्या खोट्या शान साठी नका देऊ तीचा बळी…
तिला ही अधिकार आहे कळी होऊन फुलण्याचा🙏.जन्म बाईचा बाईचा खुप घाईचा..अरे पण आधी जन्म तरी घेऊद्या..

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started